Govt Job: दूरसंचार विभागात अकाऊंटंट, स्टेनोची भरती, मुंबईत मिळेल लाखभर पगाराची नोकरी

DOT Recruitment 2024: या भरतीअंतर्ग एकूण 27 पदे भरली जाणार आहेत. 

प्रविण दाभोळकर | Updated: Sep 9, 2024, 01:37 PM IST
Govt Job: दूरसंचार विभागात अकाऊंटंट, स्टेनोची भरती, मुंबईत मिळेल लाखभर पगाराची नोकरी
दूरसंचार विभागात नोकरी

DOT Recruitment 2024: पदवीधर असून चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. केंद्र सरकार अंतर्गत येणाऱ्या दळणवळण मंत्रालयात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  संचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागात ज्युनिअर अकाऊंटंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, पीएस, स्टेनो आणि एमटीएस या पदांसाठी रिक्त जागा जाहीर भरल्या जाणार आहेत. या भरतीअंतर्ग एकूण 27 पदे भरली जाणार आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

रिक्त पदांचा तपशील

ज्युनिअर अकाऊंटंटची 9 पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेवल 5 नुसार 29 हजार 200 पर्यंत पगार दिला जाणार आहे. लोअर डिव्हीजन लिपिकची एकूण 15 पदे भरली जाणार आहेत.या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेवल 2 नुसार 19 हजार 900 पर्यंत पगार दिला जाणार आहे.  पीएसचे 1 पद भरले जाणार आहे.या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेवल 7 नुसार 44 हजार 900 ते 1 लाख 42 हजार 400 पर्यंत पगार दिला जाणार आहे.  स्टेनोचे 1 पद भरले जाणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेवल 4 नुसार 25 हजार 500 ते 81 हजार 100 पर्यंत पगार दिला जाणार आहे.  एमटीएसचे 1 पद भरले जाणार आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना लेवल 1 नुसार 18 हजार ते 56 900 पगार दिला जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्जाची शेवटची तारीख

यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना 21 ऑक्टोबरपर्यंत अधिकृत वेबसाइट dot.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

कुठे पाठवाल अर्ज?

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.  अर्ज योग्यरित्या भरुन तो संबंधित कागदपत्रांसह 'जॉइंट कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स, ऑफिस ऑफ कंट्रोलर ऑफ कम्युनिकेशन्स अकाउंट्स, महाराष्ट्र आणि गोवा, बीएसएनएल प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, जुहू रोड, या पत्त्यावर पाठवावा. सांताक्रूझ पश्चिम, मुंबई - 400054 या पत्त्यावर पाठवायचा आहे. दिलेल्या मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज पाठवण्यासाठी येथे क्लिक करा

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More