मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज भरताना आता जात पडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. याबाबतचे विधेयक विधीमंडळात मंजूर करण्यात आले आहे. निवडून आल्यावर एक वर्षानंतर जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात निवडणूक लविणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जात पडताळणी करणे खूपच धावपळीचे ठरत होते. तसेच उमेदवारी अर्जबाद होत होता. त्यामुळे आता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला वर्षभरात हे प्रमाणपत्र देण्यासाठी वेळ मिळणार आहे.
#BreakingNews । जात पडताळणी प्रमाणपत्र नसले तरीही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. राज्य सरकारने विधिमंडळात याबाबतचे विधेयक संमत केले. मात्र उमेदवाराला निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे.https://t.co/Ct4fYeN6GF pic.twitter.com/D7hG2ZiVVY
— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 12, 2020
जात पडताळणी प्रमाणपत्र नसले तरीही ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. राज्य सरकारने विधिमंडळात याबाबतचे विधेयक संमत केले. मात्र उमेदवाराला निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. यामुळे राज्यातल्या पंधराशे ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक लढविणाऱ्यांना राखीव जागांवरच्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.