२४ तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा

येत्या 24 तासात पुन्हा कोसळणार...

Updated: Jul 10, 2018, 03:50 PM IST
२४ तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबईत आज पावसानं धुमाकूळ घातला आहे. पुढच्या २४ तासात कुलाबा वेधशाळानं अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज सकाळपासूनच मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जोरदार पावसानं आज सकाळपासून सखल भागात पाणी साचलंच आहे. शहरातल्या वाहतूकीचे पुरते बारा वाजले आहेत. रस्त्यांवर वाहनांच्या रांगा आहेत. तर लोकल वाहतूक अत्यंत मंद गतीनं सुरु आहेत. आज सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईच्या हिंदमाता परिसरात पाणी साचलं आहे. पाणी साचल्यानं दादर हिंदमाता भागात अघोषित संचार बंदीसारखी स्थिती आहे.