मुंबई : जगात सर्वाधिक टूव्हीलर गाड्या विकणारी कंपनी हीरो मोटोकॉर्पने नवा वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय. कंपनीने २०१७-१८ या आर्थिक वर्षात ७५ लाखाहून अधिक टूव्हीलर विकल्या. याचाच अर्थ हीरो मोटोकॉर्प दर मिनिटाला १४ हून अधिक टूव्हीलर विकते. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक स्तरावर हा पल्ला गाठणारी हीरो मोटोकॉर्प पहिली कंपनी आहे.
कंपनीने २०१६-१७मध्ये तब्बल ६६.६ लाख मोटारसायकल आणि स्कूटर विकल्या होत्या. हे आर्थिक वर्ष संपण्याच्या तीन दिवस आधी २८ मार्चला कंपनीने हा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. कंपनीने टू-व्हीलर्स विक्रीचा ७५ लाखांचा आकडा पार केला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे २०२०पर्यंत वर्षाला एक कोटी युनिट्स विक्रीचे लक्ष्य आहे. कंपनी या नव्या आर्थिक वर्षात अनेक नव्या बाईक्स आणणार आहे. आम्ही आर्थिक वर्ष २०१८-१९मध्ये प्रीमियम आणि स्कूटर कॅटेगरीमध्ये चार मॉडेल - Xtreme 200R आणि XPulse मोटरसायकल आणि Duet 125 और Maestro Edge 12 स्कूटर येणार आहेत. कंपनीने नुकत्याच तीन नव्या बाईक Passion PRO, Passion XPRO आणि Super Splendor लाँच केल्या.
कंपनीने Xtreme 200R मोटारसायकल जानेवारीमध्ये लाँच केली होती. दरम्यान, याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीये. या बाईकमध्ये 200ccचे सिंगल सिलेंडर एअर कूल इंजिन देण्यात आलेय.