मुंबई : शहर आणि राज्यात १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत जागोजागी नाकाबंदी करण्यात येत आहे. विशेषत: रेल्वे पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आली असून प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्यानंतर मुंबई आणि देशातल्या महत्त्वाच्या शहरात हायअलर्ट जारी केला होता.
जैश-ए-मोहम्मद ही अतिरेकी संघटना मोठा कट रचत असून त्यासाठी आयएसआय संघटना मदत करत असल्याचे या हायअलर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
#Mumbai: Government Railway Police and Railway Protection Force conduct security check at Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, ahead of Independence Day. pic.twitter.com/7DQb6J1y9Z
— ANI (@ANI) August 14, 2019
दरम्यान, गुप्तचर यंत्रणांकडून एक अत्यंत महत्त्वाचा इशारादिला आहे. गुजरात पोलिसांना हा इशारा देण्यात आला असून, त्यांना सतर्क करण्यात आले आहे. पाकिस्तानातून काही दहशतवादी कच्छ भागातून गुजरात हद्दीतून देशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतील, असा इशारा देण्यात आला आहे.
गुप्तचर यंत्रणांच्या या इशाऱ्यानंतर सागरी आणि सीमा सुरक्षा दलांनी गुजरात परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. पाकिस्तानच्या बाजूने घुसखोरी होण्याची शक्यता लक्षात घेऊन डोळ्यात तेल घालून पाहारा देण्यात येत आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीर : अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जम्मूमध्ये लागू करण्यात आलेली संचारबंदी उठवण्यात आली आहे. राज्यातील सुरक्षाव्यवस्था नियंत्रणात असल्याचे अतिरिक्त महासंचालक मुनीर खान यांनी सांगितले. जम्मूमधील जनजीवन पूर्ववत असून शाळा आणि कार्यालये सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले. तर काश्मीरमध्ये मात्र, काही ठिकाणी अजूनही संचारबंदी अजूनही लागू आहे. ७३ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षाव्यवस्था चोख ठेवण्यात आल्याचं मुनीर खान यांनी स्पष्ट केले आहे.