मुंबईतल्या धोकादायक इमारतींबाबत महापालिका उदासीन का? हायकोर्टाचा सवाल

मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत पालिका प्रशासन उदासीन का? असा सवाल मुंबई हायकोर्टाने उपस्थित केलाय. 

Updated: Sep 4, 2017, 06:11 PM IST
मुंबईतल्या धोकादायक इमारतींबाबत महापालिका उदासीन का? हायकोर्टाचा सवाल title=

मुंबई : मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत पालिका प्रशासन उदासीन का? असा सवाल मुंबई हायकोर्टाने उपस्थित केलाय. 

मुंबईतील धोकादायक इमारतीबाबत पालिकेच्या कामावर हायकोर्टानं तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केलीय. याबाबत महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी जातीनं हजर राहून उत्तर द्यावे असे निर्देश कोर्टाने दिलेत. 

एल वॉर्डतील रहिवासी विजय मॅटेंना यांनी धोकादायक इमारतींबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान कोर्टाने पालिकेवर ताशेरे ओढलेत.