मुंबई : गृहनिर्माण संस्थांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. कन्व्हेयन्स, डीम्ड कन्व्हेयन्सची प्रक्रिया अतिशय सोपी करण्यात आली आहे. सोसायटी नोंदवतानाच बांधकाम व्यावसायिकांकडून कन्व्हेयन्ससाठी अत्यावश्यक कागदपत्रं घेतली जाणार आहेत, असा महत्त्वपूर्ण निर्णय सहकार विभागाने घेतलाय.
या निर्णयामुळे सोसायट्यांना डीम्ड कन्व्हेयन्स करून घेताना होणारा त्रास कायमचा वाचेल. राज्यातील सुमारे निम्म्याहून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांच्या नावावर जमीन नाही. ही बाब भविष्यात सभासदांसाठी अडचणीची ठरणार आहे.
सोसायट्यांनी कन्व्हेयन्स किंवा डिम्ड कन्व्हेयन्स करून घ्यावं असं आवाहन सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी केलंय. त्याबाबतच्या सूचना उपनिबंधकांना दिल्या गेल्या आहेत.
सोसायटी नोंदवल्यावर पुढील चार महिन्यात बिल्डरने कन्व्हेयन्स करून दिलं नाही तर सोसायटीला अर्ज आणि ठराव सादर करावा लागेल. त्यानंतर सोसायटीला डीम्ड कन्व्हेयन्स करून दिलं जाईल असं सहकार आयुक्तांनी म्हटलंय.