HSC Student Board Exam Cancelled : शरद केळकरने शेअर केली भन्नाट पोस्ट

शासनाचा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 

Updated: Jun 4, 2021, 07:18 AM IST
HSC Student Board Exam Cancelled : शरद केळकरने शेअर केली भन्नाट पोस्ट  title=

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेक गोष्टींमध्ये उलथापालथ केली आहे. शैक्षणिक क्षेत्राला याचा खूप मोठ फटका बसला आहे. अनेक बदल या कोरोनाच्या काळात घेतले गेले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने यंदा दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक विद्यार्थी आणि पालकांनी या निर्णयावर आनंद व्यक्त केला. यावर अभिनेता शरद केळकरने देखील एक भन्नाट पोस्ट शेअर केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar)

इंस्टाग्रामवर शरदने एक मीम शेअर केलं आहे. या  पोस्टमध्ये शरदच्या ‘लक्ष्मी’ या चित्रपटातील सीन आहे. तर तो सगळीकडे तोडफोड करत असल्याचे दिसत आहे. पोस्टमध्ये १२ वीच्या विद्यार्थ्यांना नातेवाईकांकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांवर विद्यार्थी कशाप्रकारे उत्तर देतील अशा आशयाची ही पोस्ट आहे. परीक्षा रद्द झाल्याने अनेक विद्यार्थी याचा आनंद घेत आहेत. या मीमला चांगली पसंती मिळत असून ह पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

शरद सोशल मिडियावर खूप सक्रिय असतो. तो नेहमी सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर करत असतो. तसेच त्याची लहान मुलगी आणि पत्नी अभिनेत्री किर्ती गायकवाड सोबत तो फोटो आणि व्हिडीओज शेअर करत असतो. 

शरदची ‘लक्ष्मी’ चित्रपटातील तृतियपंथीयाची भूमिका विशेष लोकप्रिय झाली होती. त्यानंतर त्याच्या कामाच कौतुकही झाले. या मराठमोळ्या अभिनेत्याने त्याच्या अभिनयाच्या जोरोवर अनेकांच्या मनात जागा केली आहे. त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने शरद आधिक लोकप्रिय झाला आहे.