मुंबई : गेल्या वर्षी फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहा: कार माजवला आहे. काही दिवसांपूर्वी मंदावलेल्या कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाल्याचं चित्र समोर येत आहे. कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक उपक्रम राबवले जात आहे. कोरोनावर मात करायची असेल तर मास्क एकमेव हत्यार असल्याचं देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
कोरोना काळात मास्क आवश्यक असल्याचं सरकार वारंवार सांगत असून देखील मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आतापर्यंत मास्क लावलेला नाही. राज ठाकरे यांनी मास्क लावावा म्हणून राष्ट्रवादीते नेते क्लाईड कास्टो यांनी पत्र लिहिलं आहे.
मा. श्री. राज ठाकरे जी यांन 'मास्क' घालण्या करिता माझे नम्र विनंती चे खुले पत्र
My open letter to Mr. Raj Thackeray humbly requesting him to 'Wear a Mask' @RajThackeray pic.twitter.com/zlYIRJzeM1
— Clyde Crasto - क्लाईड क्रास्टो (@Clyde_Crasto) March 7, 2021
क्लाईड कास्टो पत्रात म्हणाले, 'मी तुमचा चाहता आणि प्रशंसक आहे. हे खुले पत्र मी राजकीय पक्षातील संबंधित व्यक्ती म्हणून नव्हे, तर माझ्यासह तुमच्या अवती -भोवती वावरणाऱ्या सर्वसामान्यांची काळजी घेणारी व्यक्ती म्हणून लिहित आहे. ' असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना बाहेर असताना मास्क घालण्याची विनंती केली.
दरम्यान, कोरोना काळात राज ठाकरे यांनी कधीच मास्क लावला नाही. पत्रकारांनी राज यांनी मास्त का लावला नाही? असा प्रश्न विचारला असता, 'मी मास्क लावतच नाही तुम्हालाही सांगतो.' असं राज ठाकरे यांनी उत्तर दिलं.