शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसवणारच- उद्धव ठाकरे

जागावाटपात शिवसेनेने तडजोड केली. पण ही तडजोड महाराष्ट्राच्या हितासाठी आहे.

Updated: Oct 7, 2019, 09:50 AM IST
शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसवणारच- उद्धव ठाकरे title=

मुंबई: शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवण्याचे बाळासाहेबांना दिलेले वचन मी नक्की पूर्ण करेन. त्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते 'सामना' दैनिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपच्या आगामी काळातील वाटचालीविषयी सविस्तरपणे भाष्य केले. 

'आरे' पाकव्याप्त काश्मीर आहे का? आदित्य ठाकरेंचा सवाल

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवताना भाजप परवानगी देईल का, असा प्रश्न राऊतांनी विचारला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, मी बाळासाहेबांना तसे वचन दिले आहे. त्यामुळे कोणी ऐको न ऐको, हे वचन मी कोणालाही विचारून दिलेले नाही. त्यासाठी मी कोणाचीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे कुणाच्या परवानगीवाचून काहीही अडणार, नाही असे उद्धव यांनी सांगितले. 

होय, मी जागावाटपात तडजोड केली- उद्धव ठाकरे

याशिवा, शिवसेना-भाजपमधील जागावाटपाच्या मुद्द्यावरही उद्धव यांनी भाष्य केले. जागावाटपात शिवसेनेने तडजोड केली. पण ही तडजोड महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. मी महाराष्ट्राच्या हिताचा शब्द दिल्यानंतर तुझं माझं करून खेचाखेची करणे मला पटत नाही. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाच्यावेळी आमची अडचण समजून घ्या, अशी विनंती केली होती. ती अडचण मी समजून घेतली. एकाकी लढायचेच झाले तर शिवसेना ते कधीही करू शकते, असे उद्धव यांनी म्हटले.