६ जूननंतर कोविड-बिविड बघणार नाही, आंदोलनात मी सर्वात पुढे असेल - संभाजीराजे

खासदार संभाजीराजे यांनी आता सरकारला डेडलाईन दिली आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर त्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Updated: May 28, 2021, 05:54 PM IST
६ जूननंतर कोविड-बिविड बघणार नाही, आंदोलनात मी सर्वात पुढे असेल - संभाजीराजे title=

मुंबई : मराठा आरक्षणाच्या बाबतीत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकार कडक शब्दात इशारा दिला आहे. 'जर ६ जूनपर्यंत निकाल लागला नाही तर कोविड-बिविड बघणार नाही. मी आंदोलनात सर्वात पुढे असेल.' असा इशारा त्यांनी दिला आहे.

आता लोकांची जबाबदारी नाही तर आमदार खासदार यांची जबाबदारी आहे. मराठा समाजाच्या प्रश्नावर दोन दिवसांचे अधिवेशन व्हावे. हा चुकला तो चुकला यासाठी नाही तर समाजासाठी काय करणार हे सांगण्यासाठी. नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन आहे त्या दिवशी किंवा इतर चांगल्या दिवशी खासदार मंत्री यांची गोलमेज परिषद दिल्लीत घेणार. असल्याचं देखील संभाजीराजे यांनी सांगितलं.

ओबीसी प्रमाणे मराठा समाजातील लोकांना सवलती द्या. ६ जून हा राज्याभिषेक सोहळा आहे. शिवाजी महाराज या दिवशी छत्रपती झाले. सहा जून पर्यंत या पाच गोष्टी वर निकाल लागला नाही. तर आंदोलनाची भूमिका रायगडायवर जाहीर करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

'मला सारथीचे अध्यक्ष पद नको. समाजाचे तळागाळातील काम करणाऱ्याना सारथी मध्ये घ्या. अधिकाऱ्यांना काय कळतंय ? अण्णा साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून २५ लाखाचे कर्ज द्या. दर जिल्ह्यात वसतिगृह उभे करा. सारथीला आरक्षणा पेक्षा ही जास्त उपयोगी पडेल. 
किमान हजार कोटी सारथी ला मंजूर करा.' अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

'बहुजन समाजातील वंचितांना आरक्षण मिळावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा इच्छा होती मराठा समाजाला आरक्षण मिळावे. मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले आहे तुम्हाला केंद्रात जायचे नसेल तर तुमच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या करा. राज्य/केंद्र हात झटकू शकत नाही. ओबीसी मध्ये जायचे असेल तर प्रत्येकाला मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे.'

'तीन पर्याय काढले आहेत. आता कोण नाही म्हणतोय ते बघतो. मुख्यमंत्री, अशोक चव्हाण यांना ही सांगितले आहे. उद्या प्रकाश आंबेडकर यांना भेटणार आहे. आणखी काही लोकांना भेटणार आहे. मी सांगितलेय म्हणून लोक शांत आहेत. राजकिय पक्षाच्या भांडणाचे समाजाला घेणे देणे नाही. लोकांना वेठीस धरू नका. आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे.' अशी थेट भूमिका खासदार संभाजीराजे यांनी मांडली आहे.