अपक्ष आमदार गीता जैन शिवसेनेत दाखल

मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.  

Updated: Oct 24, 2020, 02:46 PM IST
अपक्ष आमदार गीता जैन शिवसेनेत दाखल

मुंबई : मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गीता जैन यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. 

गीता जैन या भाजपमध्ये होत्या. त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. त्यांनी भाजपच्या नरेंद्र मेहतांचा पराभव केला होता. भाजपच्या माजी नेत्या आणि विद्यमान आमदाराने शिवसेनेत प्रवेश केल्याने शिवसेनेसाठी ही मोठी जमेची बाजू मानली जात आहे.