Maharashtra Rain | राज्यात पुढचे 2 दिवस अनेक जिल्ह्यात अवकाळीचा अंदाज

राज्यात पुढचे 2 दिवस अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय. 

Updated: Apr 7, 2022, 10:22 PM IST
Maharashtra Rain | राज्यात पुढचे 2 दिवस अनेक जिल्ह्यात अवकाळीचा अंदाज title=

मुंबई :  राज्यात उष्णतेमुळे शरीराची लाहीलाही झालेली आहे. त्यात आता पुढील 2 दिवस अवकाळी पाऊस (Maharashtra unseasonal rains) होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच विदर्भात 9 ते 11 एप्रिल या दरम्यान उष्णतेच्या लाटेचाही इशारा दिला आहे. (indian meteorological department has forecast unseasonal rains in many districts of maharashtra for next 2 days)

या जिल्ह्यात पावसाचा अंदाज

सिंधुदुर्गासह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूरात आज आणि उद्या पावसाचा अंदाज आहे. तसंच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर सोबतच भंडारा, चंद्रपूर आणि नागपुरातही काही भागात विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर 9, 10 आणि 11 तारखेला बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा

तर दुसऱ्या बाजूला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. यामुळे सिंधुदुर्गात आंब्याच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तर सांगली आणि कोल्हापुरात शेतकऱ्यांना गारपिटीमुळे पिकांचं नुकसान सोसावं लागलं आहे.