भावाच्या प्री एन्गेजमेंट पार्टीत ईशाचे 'घुमर'!

अंबानी परिवारातील मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्याची होणारी पत्नी श्लोका मेहता यांचा साखरपूडा आज मुंबईत पार पडणार आहे. 

Updated: Jun 30, 2018, 11:04 AM IST
भावाच्या प्री एन्गेजमेंट पार्टीत ईशाचे 'घुमर'! title=

मुंबई : अंबानी परिवारातील मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्याची होणारी पत्नी श्लोका मेहता यांचा साखरपूडा आज मुंबईत पार पडणार आहे. त्यापूर्वी प्री एन्गेजमेंट पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत देशातील मोठमोठे व्यावसायिक आणि बॉलिवूड सेलिब्रेटीज उपस्थित होते. अंबानींच्या मुंबईतील एंटीलिया हाऊसमध्ये या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

प्री एन्गेजमेंट पार्टीत श्लोकाने गुलाबी रंगाचा लेहंगा तर आकाशने निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. आकाशची बहीण ईशा देखील गुलाबी लेहंग्यात अत्यंत सुंदर दिसत होती.

या पार्टीत नीता अंबानींनी बहारदार नृत्य सादर केले. मग ईशी तरी कशी मागे राहील. तिनेही पद्मावतमधील घुमर गाण्यावर ठेका धरला. तिच्या या नृत्याने सोहळ्याला रंग भरले. 

 

#akashambani #shlokamehta #wedding #tokoFEED

A post shared by tokoFeed Entertainment (@tokofeed) on

ईशाच्या साखरपुड्यातही नीता अंबानी यांनी जबरदस्त डान्स केला होता. काही दिवसांपूर्वी ईशाचा साखरपुडा आनंद पिरामलसोबत झाला आहे.

या प्री एन्गेजमेंट पार्टीत बॉलिवूड स्टार्स प्रियंका चोप्रा, निक जोनस, शाहरुख खान, गौरी खान, सचिन तेंडूलकर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अयान मुखर्जी आणि करण जोहर उपस्थित होते.