बॉलीवूडमधील लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध असणे हा काही गुन्हा नाही- आदित्य ठाकरे

गलिच्छ राजकारण सुरु आहे पण मी संयम बाळगलाय.

Updated: Aug 4, 2020, 07:35 PM IST
बॉलीवूडमधील लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध असणे हा काही गुन्हा नाही- आदित्य ठाकरे

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह मृत्युप्रकरणात भाजपकडून करण्यात येत असलेल्या वैयक्तिक आरोपांविषयी अखेर आदित्य ठाकरे यांनी मौन सोडले आहे. आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी एक पत्रक प्रसिद्ध केले. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सध्या सुशांत सिंह मृत्युप्रकरणावरून गलिच्छ राजकारण सुरु आहे. यामध्ये व्यक्तिश: माझ्यावर आणि ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक केली जात आहे. ही एक प्रकार वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखी आहे. पण मी अजूनही संयम बाळगला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. 

नारायण राणेंकडून मिसेस फडणवीसांची पाठराखण; वरुण सरदेसाईंना दिला इशारा

तसेच बॉलीवूडमधील लोकांशी जिव्हाळ्याशी संबंध असणे हा काही गुन्हा नसल्याचेही आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू दुर्दैवी तितकाच धक्कादायक आहे. मुंबईचे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पण ज्या लोकांचा कायद्यावर विश्वास नाही ते फालतू आरोपांचा धुरळा उडवून तपास भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

आत्महत्येपूर्वी सुशांतनं Google वर नेमकं काय सर्च केलं?

तत्पूर्वी भाजप नेते नारायण राणे यांनी मंगळवारी मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत सुशांत सिंह मृत्युप्रकरणी आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे आरोप केले. अभिनेता दिनो मोरिया याचा बंगला सुशांतच्या घरापासून काही मिनिटांच्या अंतरावर आहे. दिनोच्या घरी मंत्र्यांचं रोज येणंजाणं असतं. हे मंत्री येथे करतात तरी काय, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला होता.