ठाकरे कुटुंबात देखील फूट? वडील शिंदे गटात पण मुलगा ठाकरे गटात गेल्याने अनेकांचा भूवया उंचावल्या

ठाकरे कुटुंबातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे कुटुंबात देखील फूट पडल्याचं दिसत आहे.

Updated: Oct 8, 2022, 04:56 PM IST
ठाकरे कुटुंबात देखील फूट? वडील शिंदे गटात पण मुलगा ठाकरे गटात गेल्याने अनेकांचा भूवया उंचावल्या title=

मुंबई : राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे आणि ठाकरे (Shinde vs Thackeray) असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटावर शिवसेनेवर (Shiv sena) दावा केला जात आहे. ही लढाई कोर्टापर्यंत पोहोचली आहे. पण पक्षातील हा वाद आता ठाकरे घरापर्यंत पोहोचला आहे. कारण ठाकरे कुटुंबात देखील आता फूट पडली आहे. उद्धव ठाकरे यांचे भाऊ जयदेव ठाकरे (Jaydev Thackeray) यांनी दसरा मेळाव्याच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती. जे पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्यांच्यासोबतच स्मिता ठाकरे, निहार ठाकरे यांनी देखील एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता.

दुसरीकडे ठाकरे गटाच्या मेळाव्याला जयदेव ठाकरे यांचा मुलगा जयदीप ठाकरे (Jaydeep Thackeray) उपस्थित होते. त्यामुळे ठाकरे कुटुंबात देखील फूट पडल्याचं दिसत आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे मोठे नातू जयदीप ठाकरे यांना ठाकरे गटात कोणती जबाबदारी दिली जाते का याकडे ही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रात ठाकरे आणि शिंदे  (Thackeray vs Shinde)गटातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाहीये. राजकारणात कधी काय होऊ शकतं हे सांगता येत नाही. ठाकरे गटापुढे सध्या पक्ष वाचवण्याचं आव्हान आहे. शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा केला जात असल्याने येणाऱ्या काळात हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.