कल्याण पूर्वेला पप्पी या गुंडाची दहशत, नागरिकांना विनाकारण मारहाण

 पप्पीने  गणेश पाटील या व्यक्तीसह तिघांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

Updated: Oct 26, 2018, 05:41 PM IST
कल्याण पूर्वेला पप्पी या गुंडाची दहशत, नागरिकांना विनाकारण मारहाण title=

कल्याण : कल्याण पूर्व परिसरात गेल्या वर्षभरापासून पप्पी उर्फ प्रथमेश गवळी या गुंडाला पोलिसांनी ताब्यात घेतलयं. नागरिकांना विनाकारण मारहाण करण्यासाठी पप्पी परिसरात कुप्रसिद्ध आहे. पप्पीची दहशत इतकी आहे की त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यासही कोणी धजावत नसे. मारहाणीचे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. काल रात्रीच्या सुमारास पप्पीने  गणेश पाटील या व्यक्तीसह तिघांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यात गणेश पाटील रक्तबंबाऴ झाले. 

मारहाण झालेल्या गणेश पाटील यांची मुलगी रूग्णालयात उपचार घेतेयं. तिच्यासाठी औषध आणायला पाटील गेले असताना पप्पी गुंडाने त्यांना मारहाण केली.

नागरिक संतप्त 

मानपाडा पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने जात पाटील यांची सुटका केली आणि पप्पीला ताब्यात घेतलं.

हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झालायं. मात्र यावेळी परत पप्पी मोकाट सुटू नये अशी मागणी संतापलेल्या नागरिकांनी केलीयं.