मुंबई : कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सप्टेंबर महिन्यातील पहिला आठवडा हा सर्वाधिक रुग्ण वाढीचा आठवडा ठरला. गेल्या आठवड्याभरात मुंबईत ११०४५ रुग्ण आढळले. मुंबईतील हा सर्वात मोठा उच्चांक आहे. मुंबईकरांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
मुंबईची दिशाभूल करणारे महापौर आणि महापालिका आयुक्त माफी मागणार का? असा सवाल त्यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे.
Mumbai had 11045 Corona Positive last week, Highest. Mumbai Mayor & BMC Commissioner, who were misleading Mumbaikars will Apologize now?
गेल्या आठवड्यात मुंबईत 11045 कोरोना बाधित झाले, एक नवीन उच्चांक मुंबईकरांची दिशाभूल करणारे महापौर आणि महापालिका आयुक्त आता माफी मागणार का !?
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 7, 2020
आतापर्यंत ४२ लाख कोरोनाबाधितांचा आकडा पार केला आहे. रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. ९०,८०२ कोरोनाबाधित रुग्ण एकाच दिवशी सापडले असून गेल्या २४ तासात १०१६ कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे.
आतापर्यंत ४२,०४,६१४ कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आहे. यामध्ये ८,८२,५४२ रुग्ण ऍक्टिव्ह असून ३२,५०,४२९ बाधितांना घरी सोडले आहे. एकूण ७१,६४२ बाधितांनी आपला जीव गमावला आहे.