मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज मुंबईतल्या लसीकरण केंद्रांना भेट देवून पाहणी केली. सुरूवातीला त्यांनी कस्तुरबा रूग्णालयात जावून तिथं सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमाची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी सायन, नायर आणि केईएम रूग्णालयात जावूनही तेथील लसीकरणाचा आढावा घेतला. पाहाणी झाल्यानंतर त्यांनी मध्यमांसोबत संवाद साधला. शिवाय कोरोना रूग्णांचा संख्या वाढत राहिल्यास लॉकडाऊन करावा लागेल असं देखील किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
लॉकडाऊनबाबत मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संबोधित करणार असल्याचे त्यांनी सांगितलं. लॉकडाऊनचा विचार अद्याप केलेला नाही,परंतु अशीच रूग्णसंख्या वाढत राहिल्यास लॉकडाऊनचा विचार करावा लागेल. असं त्यांनी सांगितले.
पालिका रूग्णालयांमध्येही उद्यापासून कोव्हॅक्सिन लस दिले जाणार. २४ तास लसीकरण सुरू करण्याची तयारी करतोय. मास्क न वापरणा-यांवर कारवाई करून ४० कोटी रूपये दंड वसूल करण्यात आलाय. जेजे सारखी घटना मुंबई महापालिका रूग्णालयात समोर आलेले नाही. नियमनुसारच लस द्यायला हवी. तीळगूळ वाटल्यासारखी लस देवू नये.