Petrol Price Today : जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर

पेट्रोल डिझेलचे आजचे दर

Updated: Jan 4, 2021, 09:31 AM IST
Petrol Price Today : जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे दर  title=

नवी दिल्ली : पेट्रोल (Petrol Price Today) डिझेलच्या (Disel Price Today) किंमतीमध्ये आज सलग २८ व्या दिवशी कोणताही बदल झाला नाहीय. याआधी पेट्रोल-डिझेलचे दर सलग 6 दिवस वाढत होते. आज तेल मार्केटींग कंपन्यांनी किमतींमध्ये कोणताही बदल केला नाही. याआधी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत सलग 48 दिवसांपर्यंत बदलल्या नव्हत्या. नोव्हेंबर २० पासून या किंमती वाढण्यास सुरुवात झाली. यावेळी दर 17 वेळा बदलले. 

मार्चनंतर सप्टेंबरमध्ये पहिल्यांदाच डिझेलच्या दरात कपात झाली. तेल कंपन्यांनी 82 दिवस कोणता बदल केला नाही. वाढलेल्या एक्साइज ड्युटीसोबत तेलाची कमी झालेल्या किंमतीशी त्यांना ताळमेळ साधायचा होता. 

मुंबईत आज पेट्रोलचे दर 90.34 रुपये प्रति लीटर आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोल 83.71, कोलकातामध्ये 85.19, चेन्नईमध्ये 86.51 रुपये प्रति लीटर आहे.

डिझेलचे दर 

मुंबईमध्ये डिझेलचे दर 80.51, दिल्लीमध्ये 73.87, कोलकातामध्ये 77.44. चेन्नईमध्ये 79.21 रुपये प्रति लीटर आहे. 

पेट्रोल-डिझेलचे दर SMSच्या माध्यमातून देखील जाणून घेता येऊ शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. 

बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122  या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात.