close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सुट्टीत मुंबई फिरायला येताय ? टुरिस्ट तिकीट बद्दल माहीत आहे का ?

सेंट्रल आणि वेस्टर्न लाईनच्या कोणत्याही स्थानकापर्यंत तुम्ही या टुरिस्ट तिकीटने प्रवास करु शकता.

Pravin Dabholkar & Updated: Apr 26, 2019, 10:25 AM IST
सुट्टीत मुंबई फिरायला येताय ? टुरिस्ट तिकीट बद्दल माहीत आहे का ?

मुंबई : मुंबईत रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आधीच डब्ब्यांमध्ये गर्दी त्यात रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरही रांगाच रांगा पाहायला मिळतात. अशावेळी मुंबई फिरण्यासाठी आलेला प्रवासी भांबावून जातो. पण दिवसभर, तीन दिवस किंवा पाच दिवस केवळ रेल्वे प्रवास करावा लागणार असेल तर टुरिस्ट तिकिट हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. तुमच्याकडे घरी कोणी पाहुणा आला असेल ज्याला रेल्वे प्रवास करत मुंबई दर्शन करायचे असेल तर हा उत्तम पर्याय आहे. यामुळे त्यांचा प्रत्येक रेल्वे स्थानकावर उतरुन तिकिट काढण्याचा वेळ वाचू शकतो. मुंबई लोकलचे टुरिस्ट तिकिट 1, 3 आणि 5 दिवसांसाठी असते. फर्स्ट आणि सेकंड क्लाससाठी हा पर्याय उपलब्ध आहे. नेहमीच्या रेल्वे प्रवाशांसाठी महिन्याचा पासच सोयीस्कर ठरतो. 

Cost

सेंट्रल आणि वेस्टर्न लाईनच्या कोणत्याही स्थानकापर्यंत तुम्ही या टुरिस्ट तिकीटने प्रवास करु शकता. एवढेच नव्हे तर दिवसभरातील तुमच्या रेल्वे प्रवासावर बंधन नसतं. जर तुमच्याकडे कोणी पाहुणे मुंबई पाहण्यासाठी येत असतील तर तीन दिवस गर्दी नसलेल्या वेळात जाऊनही तुम्ही तिकीट काढु शकता. सेकंड क्लासने प्रवास करणाऱ्या प्रौढांसाठी एका दिवसाचे टुरिस्ट तिकीट 75 रुपयांत, तीन दिवसांचे टुरिस्ट तिकिट 135 तर पाच दिवसांचे टुरिस्ट तिकीट 135 रुपयांना मिळते. लहान मुलांसाठी टुरिस्ट तिकीटाचे एका दिवसाचे 55 रुपये, तीन दिवसांसाठी 75 रुपये तर पाच दिवसांसाठी 85 रुपये होतात. 

टुरिस्ट तिकिटावर फर्स्ट क्लासने प्रवासने करु इच्छिणाऱ्या प्रौढांना दिवसाचे 275 रुपये, तीन दिवसांच्या तिकीटाचे 440 रुपये तर पाच दिवसांसाठी 515 रुपये मोजावे लागणार आहेत. तर फर्स्टक्लासने प्रवास करणाऱ्या लहान मुलांसाठी दिवसाचे 170, तीन दिवसांचे 250 आणि पाच दिवसांचे 290 रुपयांपर्यंतचे टुरिस्ट तिकीट उपलब्ध आहे.