मुंबईत वर्षाच्या मुलीने कानातील रिंग गिळली आणि...

वाडिया रुग्णालयात एक वर्षाच्या चिमुकलीने गिळलेली कानातली रिंग श्वास नलिकेतून यशस्वी काढण्यात आली. 

Updated: Jun 16, 2018, 10:30 PM IST
मुंबईत वर्षाच्या मुलीने कानातील रिंग गिळली आणि... title=

मुंबई : वाडिया रुग्णालयात एक वर्षाच्या चिमुकलीने गिळलेली कानातली रिंग श्वास नलिकेतून यशस्वी काढण्यात आली. विशेष म्हणजे शस्त्रक्रीया न करता दुर्बिणीच्या सहाय्यानं ही रिंग काढण्यात आली. कुर्ला इथं राहणारे संदीप सोनी यांची मुलगी खुशी हिने आठवड्यापूर्वी कानातील रिंग गिळली होती. घरात कुणालाही हे कळलं नाही. रिगं गिळल्यानं तर मात्र खुशीला खोकला सुरु झाला. 

तिची तब्येत वारंवार बिघडू लागली.. एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी काढलेल्या एक्स रे मध्ये श्वसननलिकेत रिंग असल्याचे दिसून आले. परंतु तेथील डॉक्टरांना ती रिंग काढण्यात अपयश आल्यानं अखेर  कुशीला वाडिया रुग्णालयात दाखलकरण्यात आलं..वाडिया रुग्णालयातील कान नाक घसा विभागाचे प्रमुख डॉ दिव्या प्रभात यांनी शस्त्रक्रिया न करता केवळ अर्ध्या तासात ब्रॉन्कोस्कोपी करून दुर्बिणीद्वारे श्वसननलिकेत अडकलेली रिंग तोंडावाटे बाहेर काढली.