Mumbai Budget 2023 Updates : सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकीक असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा (BMC) अर्थसंकल्प आज मांडला गेला आहे. (Mumbai Municipal Corporation Budget 2023) आगामी निवडणुकीच्या तोंडावर अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. ( BMC Budget In Marathi ) यावर्षीच्या अर्थसंकल्पाचं ( Mumbai News) आकारमान 50 हजार कोटी रुपयांच्या वर गेले आहे. (BMC Budget 2023 ) मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्प तब्बल 52619 कोटी रुपयांचा सादर करण्यात आलाय. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बजेटमध्ये 14.52 टक्के म्हणजे 6670 कोटी रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी 45949 कोटींचे बजेट होते.
4 Feb 2023, 11:53 वाजता
BMC Budget 2023 Updates : मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला. ते म्हणाले, 52619.07 कोटी रुपयांचे हे बजेट आहे. प्रथमच 50 हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 14.50 टक्के अर्थसंकल्पात वाढ करण्यात आली आहे. गेल्या 5 वर्षाशी तुलना केली आता 52 ट्क्के कॅपिटल म्हणजे विकासवर खर्च होणार 48 टक्के इतर गोष्टींवर खर्च होणार आहे. विकास कामांवर प्रथमच 50 टक्के अधिक खर्च केला जाईल.
4 Feb 2023, 11:34 वाजता
BMC बजेटमध्ये कोणतीही करवाढ नाही !
BMC Budget 2023 Updates : मुंबई महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये कोणताही मोठा नविन प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाही. जे प्रकल्प हाती घेण्यात आलेत, त्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही.
4 Feb 2023, 11:32 वाजता
BMC Budget 2023 Updates : पाणी पुरवठा प्रकल्प विभागासाठी 1376 कोटी. गेल्यावर्षी 887.88 कोटी
- आधुनिक तृतीय स्तर जल प्रक्रिया केंद्र. यात कुलाबा येथे मलनिस्सारण केंद्रातील मलजलाचे पाणी पिण्यायोग्य पाण्यामध्ये रुपांतरित करणार प्रतिदिन 12 दशलक्ष लिटर पाणी यासाठी 32 कोटी
- जलवाहन बोगद्याच्या कामासाठी 119.50 कोटी
- जलवाहिन्यांचे पुनर्वसन आणिपुनरस्थापना 136 कोटी
4 Feb 2023, 11:27 वाजता
शिक्षण विभागाचे संबंधित महत्त्वाचे प्रकल्पासाठी विशेष तरतूद
BMC Budget 2023 Updates : मुंबई महापालिका शिक्षण विभागाचे संबंधित महत्त्वाचे प्रकल्प आणि धोरणाचा अर्थसंकल्पामध्ये (BMC Budget 2023) विशेष तरतूद
- शिक्षण विभाग अंतर्गत नवीन योजना व प्रकल्प
- बीएमसी शाळेतील मुख्याध्यापकांना नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार
- बीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास यावर अधिक भर दिला जाणार
- मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या बदल्यांबाबत ऑनलाईन सॉफ्टवेअरची निर्मिती
- दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता साहित्य खरेदी केली जाणार
- बीएमसी शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, बोलक्या संरक्षण भिंतीची निर्मिती, नाविन्यपूर्ण गणित व विज्ञान केंद्र उभारणी केली जाणार
4 Feb 2023, 11:23 वाजता
BMC Budget 2023 Updates : मुंबई महापालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात सात एसटीपी प्रकल्पांसाठी 2792 कोटी रूपयांची तरतूद
4 Feb 2023, 11:22 वाजता
BMC Budget 2023 Updates : मुंबई महापालिका सामाजिक प्रभाव उपक्रम.महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी यांच्यासाठी भरीव तरतूद
- महिला बचतगट - 11.65 कोटी
- महिला अर्थ सहाय्य योजना - 100 कोटी
- दिव्यांग व्यक्तीसाठी अर्थ सहाय्य 25.32 कोटी
- तृतीय पंथीयांसाठी पहिल्यांदाच अर्थ सहाय्य 2 कोटी
- ज्येष्ठ नागरिक - 11 कोटी
- महिलांसाठी प्रशिक्षण योजना 6.44 कोटी
4 Feb 2023, 11:20 वाजता
BMC Budget 2023 Updates : राज्य सरकारकडून मालमत्ता करासह विविध येणे थकबाकी 7223 कोटी इतकी आहे. थकबाकी देण्याची पालिकेची राज्य सरकारला विनंती
4 Feb 2023, 11:19 वाजता
BMC Budget 2023 Updates : मुंबई महापालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात पर्जन्य जलवाहिन्यांसाठी 2570 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
4 Feb 2023, 11:15 वाजता
BMC Budget 2023 Updates : मुंबई अग्निशमन दलासाठी 227 कोटींची तरतूद
4 Feb 2023, 11:14 वाजता
BMC Budget 2023 Updates : मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात मुंबईचा वाढत प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पहिल्यांदा दीड हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे