BMC Budget 2023 LIVE Updates : मुंबई पालिकेचे 52619 कोटींचे बजेट, 'यासाठी' विशेष तरतूद

 Budget 2023 Updates :  मुंबई महानगरपालिकेचा (BMC) अर्थसंकल्प आज मांडला गेला आहे. (Mumbai Municipal Corporation Budget 2023) आगामी निवडणुकीच्या तोंडावर अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. ( BMC Budget In Marathi ) यावर्षीच्या अर्थसंकल्पाचं ( Mumbai News) आकारमान 50  हजार कोटी रुपयांच्या वर गेले आहे. (BMC Budget 2023 )  

BMC Budget 2023 LIVE Updates : मुंबई पालिकेचे 52619 कोटींचे बजेट, 'यासाठी' विशेष तरतूद

Mumbai Budget 2023 Updates : सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकीक असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा (BMC) अर्थसंकल्प आज मांडला गेला आहे. (Mumbai Municipal Corporation Budget 2023) आगामी निवडणुकीच्या तोंडावर अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. ( BMC Budget In Marathi ) यावर्षीच्या अर्थसंकल्पाचं ( Mumbai News) आकारमान 50  हजार कोटी रुपयांच्या वर गेले आहे. (BMC Budget 2023 ) मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्प तब्बल 52619 कोटी रुपयांचा सादर करण्यात आलाय. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बजेटमध्ये 14.52 टक्के म्हणजे 6670 कोटी रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी 45949 कोटींचे बजेट होते.

4 Feb 2023, 11:14 वाजता

BMC Budget 2023 Updates : मुंबईचा वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वायू प्रदूषण नियंत्रण कृती योजना अस्तित्वात आणली आहे. दरवर्षी हिवाळ्यात हवा गुणवत्ता निर्देशांक खराब होतो त्यामुळे हवेच्या गुणवत्ते वर परिणाम होतो

4 Feb 2023, 11:14 वाजता

BMC Budget 2023 Updates : आरोग्य विभागासाठी 1680 कोटी रूपयांची तरतूद. मागील वर्षी  1287 कोटींची तरतूद होती. 

4 Feb 2023, 11:12 वाजता

 BMC Budget 2023 Updates :  भायकळा येथील राणीच्या बागेसाठी 140 कोटींची तरतूद  ।  गेट-वे ऑफ इंडियाचं सुशोभिकरण होणार 

4 Feb 2023, 11:11 वाजता

मुंबईत चार्जिंग स्टेशनची उभारणी होणार

BMC Budget 2023 Updates : मुंबई महापालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांकरीता चार्जिंग स्टेशनची उभारणी होणार, खासगी कंपन्यांद्वारे उभारणी होणार आणि पालिकेची उत्पन्नात भागिदारी तत्वावर महसूल उभारणीचा प्रयत्न 

4 Feb 2023, 11:10 वाजता

गेट-वे ऑफ इंडियाचं सुशोभिकरण

BMC Budget 2023 Updates : मुंबई मलनिसारण प्रकल्प सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी 2792 कोटी रुपये तरतूद तर गेट-वे ऑफ इंडियाचं सुशोभिकरण होणार 

4 Feb 2023, 11:09 वाजता

BMC Budget 2023 Updates :  मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात  गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1060 कोटी रूपयांची तरतूद

 

4 Feb 2023, 11:09 वाजता

BMC Budget 2023 Updates :  मुंबईकरांना पार्किंग अ‍ॅपच्या मदतीने 32 सार्वजनिक पार्किंग लॅाट आणि 91 ॲानस्ट्रीट वाहनतळ सेवा मिळणार आहे

4 Feb 2023, 11:05 वाजता

 रस्ते आणि पुलांसाठी भरीव तरतूद

BMC Budget 2023 Updates :  मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात रस्ते आणि पुलांसाठी 4925 कोटी रुपयांची तरतूद

4 Feb 2023, 11:03 वाजता

बेस्टला 800 कोटी  तर कोस्टल रोडसाठी 3545 कोटी

BMC Budget 2023 Updates :  मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात  बेस्टला 800 कोटी रुपयांची मदत दिली जाणार तर कोस्टल रोडसाठी 3545 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

4 Feb 2023, 10:55 वाजता

BMC Budget 2023 Updates :  मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्प तब्बल 52619 कोटी रुपयांचा सादर करण्यात आलाय. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बजेटमध्ये 14.52 टक्के म्हणजे 6670 कोटी रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी 45949 कोटींचे होते बजेट