Lockdown : सर्व प्रकारचे सहकार्य सरकारला करू - फडणवीस

राज्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता

Updated: Apr 10, 2021, 06:39 PM IST
Lockdown : सर्व प्रकारचे सहकार्य सरकारला करू - फडणवीस

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. यावेळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कठीण काळात सरकारसोबत असल्याचं सांगितलं.

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, 'बैठकीला आम्हाला निमंत्रित केले या बद्दल धन्यवाद. कोरोना वाढतोय यात दुमत नाही. रेमेडिसीवर अवस्था बिकट आहे. कोरोना चाचणी केल्यावर रिपोर्ट तात्काळ येतील याची व्यवस्था करणे आवश्यक आहे, खाजगी स्तरावर रेमेडिसीवर उपलब्ध नाही. आणखी बेड निर्माण करावे लागतील. उद्योग क्षेत्रासाठी इतर ठिकाणाहून ऑक्सिजन कसा मिळेल हे पाहावे लागेल.'

'निर्बंध असले पाहिजेत पण जनतेचा उद्रेक लक्षात घेतला पाहिजे. आम्ही मेलो तरी चालेल पण लॉकडाऊन नको अशा भूमिकेचं आम्ही समर्थन करत नाही. पण याचा विचार व्हावा. राज्यावर ताण आहे हे मान्य आहे. छोटा उद्योजक आणि नोकरदार यांचा विचार व्हावा.' असं ही फडणवीसांनी म्हटलं आहे.

'लोकांची परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. आता राजकारण होऊ नये हे आम्हाला मान्य आहे. पण आपण सत्ता पक्षातल्या मंत्र्यांना ही सांगा. त्यांनी उठायचे आणि केंद्राकडे बोट दाखवायचे. त्यामुळे आम्हाला उत्तर द्यावे लागते. आम्ही सर्व प्रकारचे सहकार्य सरकारला करू.' असं ही फडणवीसांनी म्हटलं आहे.

 'कठीण परिस्थितीतून आपण चाललो आहोत. लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही पण जगाने तो स्वीकारला आहे.' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत म्हटलं आहे.