विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज अखेरचा दिवस

विधानसभा रणसंग्रामाच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे.  

Updated: Oct 19, 2019, 07:41 AM IST
विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज अखेरचा दिवस title=

मुंबई : विधानसभा रणसंग्रामाच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांची प्रचारासाठी लगबग सुरु आहे. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या आज नवापूर, अकोले आणि कर्जत जामखेडमध्ये सभा आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विदर्भात प्रचार करणार असून सकाळी नागपुरात पदयात्रा काढणार आहेत. 

पाटणसावंगी, भंडारा, चंद्रपूरच्या चिमूर आणि सावलीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभा आहेत. नितीन गडकरी विदर्भात चार सभा घेत आहेत. नागपूरच्या रामटेक, काटोलमध्ये, नागपूर दक्षिणमध्ये तसंच वर्ध्याच्या आर्वीत प्रचार करणारेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आज मुंबई आणि उपनगरात सभा आहेत. मालाड पश्चिमेत तसेच कल्याण पूर्वमध्ये त्यांची सभा होणार आहे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी देखील प्रचारात आहेत. 

उल्हासनगर, अमळनेर, चाळीसगाव, यवतमाळमध्ये सभा होणारेय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज साताऱ्यातल्या माणमध्ये तसंच महाड, श्रीवर्धन, उरण, कर्जतमध्ये शेवटच्या दिवशी सभा होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भोर, अहमदनगर, इंदापूर, बारामतीत सभा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर विदर्भात असून काटोल, अर्जुना आणि गोंदिया तसंच देगलुरमध्ये सभा होणार आहेत.