ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील उमेदवार ठरले, संभाव्य 21 उमेदवारांची यादी झी 24 तासच्या हाती

Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. पण सर्व पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत.  

राजीव कासले | Updated: Sep 5, 2024, 05:24 PM IST
ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील उमेदवार ठरले, संभाव्य 21 उमेदवारांची यादी झी 24 तासच्या हाती title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi)  सज्ज झाली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट प्रत्येकी 100 जागा लढणार असल्याची माहिती मिळेतय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी 80 जागा सोडल्या जाणार? तर  इतर छोट्या घटक पक्षांना 8 ते 12 जागा देण्यावर सहमती झाल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे  ज्याच्या जास्त जागा निवडून येतील, त्याचा मुख्यमंत्री? असंही ठरलंय. 

ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतले उमेदवार ठरले
महाविकास आघाडीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (ShivSena UBT) गटाने मुंबईतील संभाव्य उमेदवार ठरवले आहेत. मुंबई विधानसभेच्या 36 जागांपैकी 21 जागांवर ठाकरेंची शिवसेना निवडणूक लढवणार असल्याचं या यादीवरुन स्पष्ट होतंय. त्यामुळे मुंबईत महाविकास आघाडीत ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचं समोर आलं आहे. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 14 जागा जिंकल्या होत्या. 

पण आता शिवसेनेमधल्या फुटीनंतर शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना अशी विभागली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मुंबईकर कोणत्या शिवसेनेच्या पारड्यात मतं टाकणार हे लवकरच स्पष्ट होईल. या दृष्टीने दोन्ही शिवसेनेने तयारी सुरु केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतल्या आपल्या संभाव्या उमेवारांची यादीही तयारी केली आहे. संभाव्य 21 उमेदवारांची यादी झी 24 तासच्या हाती लागली आहे. यानुसार चांदिवली काँग्रेसकडे तर वांद्रे पूर्व ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाईंना उतरवण्याची ठाकरे गटाची तयारी सुरु आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुंबईतील संभाव्य उमदेवार  

1.  सुदेश पाटेकर/ संजना घाडी : मागाठणे

2. विनोद घोसाळकर/तेजस्वी घोसाळकर : दहिसर 

3. सुनिल प्रभू : दिंडोशी 

4. अमोल किर्तीकर/ बाळा नर : जोगेश्वरी 

5. ऋतुजा लटके : अंधेरी पश्चिम 

6. राजू पेडणेकर/ राजूल पटेल : वर्सोवा 

7. वरूण सरदेसाई : वांद्रे पूर्व

8. विशाखा राऊत : दादर-माहिम 

9. अजय चौधरी/ सुधीर साळवी : शिवडी 

10. आदित्य ठाकरे : वरळी 

11. मनोज जामसूतकर/ रमाकांत रहाटे : भायखळा 

12.  प्रकाश फातर्पेकर : चेंबुर 

13. रमेश कोरगांवकर : भांडुप 

14. सुनिल राऊत : विक्रोळी 

15. संजय पोतनीस : कलिना

16. प्रमोद शिंदे : अणुशक्तीनगर 

17.  सुरेश पाटील : घाटकोपर पश्चिम

18. प्रविणा मोरजकर : कुर्ला 

19. निरव बारोट : चारकोप 

20. समीर देसाई : गोरेगाव 

21. श्रद्धा जाधव : वडाळा

मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केलीय. ठाकरेंवर दिल्लीत गल्लोगल्ली फिरण्याची वेळ आलीय. मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित करा म्हणण्याची वेळ आता त्यांच्यावर आलीय. हे पाहून बाळासाहेबांना दु:ख होत.बाळासाहेबांचे विचार सोडल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप शिंदेंनी केलाय.