मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १२,६१४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर उपचार सुरु असलेल्या ३२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५,८४, ७५४ इतकी झाली आहे. यापैकी ४,०८,२८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामध्ये आज घरी सोडण्यात आलेल्या ६,८४४ जणांचा समावेश आहे.
आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात रस नाही, कोरोना रोखण्यावर आमचा भर- फडणवीस
मात्र, राज्याच्यादृष्टीने चिंतेची बाब असलेला मृत्यूदर अजूनही घटलेला नाही. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळे १९,७४९ लोकांचा बळी गेला आहे. शनिवारच्या आकेडवारीनुसार राज्यातील कोरोनाचा मृत्यूदर ३.३८ टक्के इतका आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत हा दर जास्त आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होऊनही अद्याप चिंतेचे वातावरण आहे.
... म्हणून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांची संख्या घटली
याशिवाय, सध्या राज्यात १०, ४४, ९७४ जण होमक्वारंटाईनमध्ये तर ३७,५२४ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्याच्या घडीला राज्यात १, ५६,४०९ एक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.८२ टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, सरकारकडून राज्यातील कोरोना चाचण्यांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढवण्यात आली आहे. सध्या प्रत्येक दिवसाला जवळपास ७५ हजार कोरोना चाचण्या होत आहेत. मात्र, यापैकी बहुतांश चाचण्या या अँटीजेन स्वरुपाच्या असल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे. कोरोना निदानाची ही पद्धत तितकीशी विश्वासार्ह नाही. त्यामुळे RT-PCR स्वरुपाच्या चाचण्यांची संख्या वाढली पाहिजे. अँटीजेन आणि RT-PCR चाचण्यांचे गुणोत्तर १:१ असायला हवे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.