मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला, पावसाळी अधिवेशाचीही तारीख ठरली

मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर लगेचच पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे

Updated: Aug 8, 2022, 02:08 PM IST
मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला, पावसाळी अधिवेशाचीही तारीख ठरली title=

Maharashtra Assembly :  शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर निघालाय. उद्या सकाळी ११ वाजता हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. उद्या 18 ते 20 मंत्र्यांचा शपथविधी होण्याती शक्यता आहे. त्यानंतर आता पावसाळी अधिवेशनाचीही तारीख ठरली आहे. 

10 ते 17 ऑगस्ट दरम्यान पावसाळी अधिवेशन होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गेल्या एक तासापासून महत्त्वाची बैठक सुरु आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच मंत्रिमंडळात समावेश होणाऱ्या काही नावांचा फेरविचारही या बैठकीत होण्याची शक्यता आहे. 

उद्या मंत्रिमंडळ विस्तार
शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत राज्याचे डोळे लागून होते. विरोधकांकडूनही वारंवार यांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. परंतू आता उद्या म्हणजे 9 ऑगस्टला सकाळी 11 वाजता राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, शपथविधीदेखील होणार आहे. राजभवनावर सकाळी हा शपथविधी होणार आहे.

ज्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. त्यांना आज सायंकाळपर्यंत मुंबईत येण्याचे निरोप मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात छोटेखानी मंत्रिमंडळ असेल अशी माहितीही मिळेतय.