पोलिसांसाठी 1 लाख घरं बांधणार, मुख्यमंत्री ठाकरे यांची मान्यता

मुंबईत पोलिसांसाठी 1 लाख घरे बांधणार ( Police Houses) असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जाहीर केले.  

Updated: Jan 26, 2021, 02:22 PM IST
पोलिसांसाठी 1 लाख घरं बांधणार, मुख्यमंत्री ठाकरे यांची मान्यता  title=
संग्रहित छाया

मुंबई : मुंबईत पोलिसांसाठी 1 लाख घरे बांधणार ( Police Houses) असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याला मान्यता दिल्याचे ते म्हणाले. पोलिसाठी राज्य सरकार हेलिकॉप्टर घेणार असल्याचे ते म्हणाले. 

पोलिसांसाठी हेलिकॉप्टर घेणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल असे गृहमंत्री म्हणाले. अमली पदार्थ सेलही सक्षम करण्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. मुंबईत पाच सायबर पोलीस ठाण्यांचे आज मुंबईत उद्घाटन करण्यात आले. दक्षिण, मध्य, पश्चिम, पूर्व, उत्तर अशा चार विभागांमधेये सायबर पोलीस ठाणी आहेत. 

दरम्यान, राज्यात पोलिसांसाठी घरे कमी आहेत. त्यामुळे ती बांधण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. एखादा बिल्डर आपल्या जागेवर पोलिसांसाठी घर बांधून देत असेल, तर त्याला 4 एफएसआय आणि इतर सुविधा देण्याचा विचार सुरू आहे. ही सर्व घरे पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या नावानेच बांधली जाणार आहेत. जवळपास एक लाख घरे महाराष्ट्र पोलिसांसाठी बांधण्याची तयारी आम्ही केली आहे, असे अनिल देशमुख म्हणाले.

 येत्या आजपासून जेल टुरिझमला सुरुवात होईल. येरवडा जेलसोबत महात्मा गांधींच्या आठवणी आहे. येरवडानंतर इतर जेलमध्ये सुद्धा हे करण्यात येणार आहे. जेल कसे असते याची उत्सुकता नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना असते. त्यामुळे हे सुरु करण्यात येत आहे, असेही अनिल देशमुख यांनी नागपूर येथे सांगितले.