Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संध्याकाळी 5 वाजता जनतेशी संवाद, राजीनामा देणार?

महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) जनतेशी फेसबूकद्वारे संवाद साधणार आहेत.

Updated: Jun 22, 2022, 04:48 PM IST
Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा संध्याकाळी 5 वाजता जनतेशी संवाद, राजीनामा देणार? title=

कृष्णात पाटील, झी मीडिया मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरु असताना मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) जनतेशी फेसबूकद्वारे संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे फेसबूकच्या माध्यमातून मोठ घोषणा करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचीही शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री संध्याकाळी नक्की काय घोषणा करणार, याच्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे (maharashtra political crisis cm uddhav thackeray addresing to people today 5 pm via video conferencing)