Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदे सरकारचा महिनाअखेरीस मंत्रिमंडळ विस्तार?

राज्यातल्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) वाद सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे.

Updated: Jul 20, 2022, 08:32 PM IST
Maharashtra Cabinet Expansion : एकनाथ शिंदे सरकारचा महिनाअखेरीस मंत्रिमंडळ विस्तार? title=

मुंबई :  राज्यातल्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) वाद सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. याप्रकरणी आता येत्या 1 ऑगस्टला पुढील सुनावणी होणाराय. पण तोपर्यंत राज्य मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झालाय. (maharashtra political crisis know when state cabinet expansion see special report)

तीन आठवडे उलटले मात्र अजूनही शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच राज्याचा गाडा हाकतायंत. वारंवार टीका होऊनही मंत्रिमंडळ विस्तार करण्याचं दोघांनी मनावर घेतल्याचं दिसत नाहीये. 

राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती असताना पालकमंत्र्यांचा पत्ताच नाही. त्यामुळे बाकीच्या मंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? दोन जणांच्या सरकारचा विस्तार कधी होणार? हे प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ लागले आहेत.

का रखडला कॅबिनेट विस्तार?

कारण शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावरून कायदेशीर लढाई सुरू झालीय. राज्यातील शिंदे सरकारचा फैसला सुप्रीम कोर्ट करणाराय.  याबाबतची पुढील सुनावणी येत्या १ ऑगस्टला होणाराय. तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार रखडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारावर कोर्टानं बंदी घातलेली नाही. त्यामुळं लवकरच नव्या मंत्र्यांचा शपथविधी होईल, असा दावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलाय. एवढंच नव्हे तर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात मुख्यमंत्र्यांना काहीच राजकीय अडचण नाही, असं घटनातज्ज्ञांचंही म्हणणं आहे.

जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत मंत्रिमंडळाचा पहिल्या टप्प्यातील शपथविधी पार पडेल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.. येत्या ऑगस्टमध्ये राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पार पडणाराय. 

त्याआधीच पहिल्या टप्प्याचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी शक्यता आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कायदेतज्ज्ञ कुठलाही अडथळा नसल्याचं सांगतायंत. मग मंत्रिमंडळ विस्ताराचं घोड नेमकं कुठं अडलंय असा प्रश्न राज्यातल्या जनतेला पडलाय.