MP Amol Kolhe Viral Tweet: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप (Maharashtra Political Crisis) पाहिला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याबरोबर हातमिळवणी करत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी लगेचच उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. त्यांच्याबरोबर 8 आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी राजभवनामध्ये शरद पवार यांचे जवळचे नेते उपस्थित असल्याने आश्चर्य व्यक्त केलं गेलं. यात नुकतेच कार्याध्यक्ष झालेले प्रफुल्ल पटेल यांच्या शिवाय छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांचा समावेश होता. याशिवाय खासदार अमोल कोल्हेही (Amol Kolhe) शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
त्यामुळे अमोल कोल्हे हे देखील अजित पवारांसोबत आहेत का? असा प्रश्न विचारला जात होता. पण अमोल कोल्हे यांनी काल संध्याकाळी शरद पवारांची भेट घेतल्याचं बोललं जात होतं. आज अमोल कोल्हे यांनी ट्विट करुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी साहेबांसोबत असल्याचं ट्विट अमोल कोल्हे यांनी केलं आहे. याबोबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. यात त्यांनी एक कॅप्शन दिलं आहे. यात त्यांनी म्हटलंय, जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं।
जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं।#मी_साहेबांसोबत @NCPspeaks @PawarSpeaks @Jayant_R_Patil @supriya_sule @Awhadspeaks @TV9Marathi @SakalMediaNews @abpmajhatv @mataonline @SaamanaOnline @SarkarnamaNews @thodkyaat… pic.twitter.com/2kAhkkfnjd
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 3, 2023
दरम्यान,कालच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असलेले अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके आणि संग्राम जगताप यांनी आज मात्र तटस्थ भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध आहे, कोणतीही फूट नाही अस या दोन्ही आमदारांनी म्हंटलंय. खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्हीच आहोत असा दावा अजित पवारांसह गेलेले राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. केंद्रात सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय लवकरच घेऊ असंही ते म्हणाले.
रोहित पवारांची प्रतिक्रिया
अजित पवारांच्या भूमिकेवर आमदार रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अनेक वर्ष या ज्या नेत्यांना पवार साहेबांनी ताकद आणि पदे दिली ज्यांच्या मुळे ते मोठे झाले ते जर सत्तेसाठी जात असतील तर ते वाईट आहे. त्यामुळे जे स्वतःचा विचार करतात त्यांचा आम्ही विचार करत नाही पण, तुमच्या माध्यमातून दादांना पुन्हा येण्याची विनंती करतो ते मोठे नेते आहेत पण विनंती नक्कीच करू शकतो, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.