'उद्धव ठाकरे करमणुकीकरता राहिलेत' भाजपने मातोश्रीवर पाठवला विदुषकाचा ड्रेस

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं राजकारण आता राज्यात अधिक तीव्र होऊ लागलं आहे. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर बोलताना आपल्या भाषणात टरबुज्या असा उल्लेख केला. त्याला आता भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 12, 2023, 04:57 PM IST
'उद्धव ठाकरे करमणुकीकरता राहिलेत'  भाजपने मातोश्रीवर पाठवला विदुषकाचा ड्रेस title=

Maharashtra Politics : जळगावमध्ये झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर निशाणा साधत गंभीर आरोप केले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात चार ते पाच वेळा टरबुज्या असा शब्द वापरला. जालनात मराठा आंदोलकांवर (Marath Andolak) पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जप्रकरणी बोलताना उद्धव ठाकरे यांनी 'जालियनवाला बाग' हत्याकांडाप्रमाणे कोणी तरी 'जालनावाला कांड' करु पाहतंय, सगळ्यांच्या तोंडी एकच नाव आहे. असं म्हटलं. यावेळी गर्दीतून जोरजोरात ओरडा सुरु झाला. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी टरबुज्या असा उल्लेख केला. टरबुज्यासारखा माणून मी पाहिलेला नाही. पण तुम्ही म्हणत असाल तर ठिक आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

भाजपाकडून प्रत्युत्तर
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर (Devendra Fadanvis) टरबूजा म्हणून टीका केल्यानंतर भाजप (BJP) चांगलंच आक्रमक झालंय. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chira Wagh) यांनी उद्धव ठाकरेंना विदूषकाचा ड्रेस पाठवलाय. उद्धव ठाकरे यांना आपण करमणूकीपुरते राहिलो असे वाटलं पाहिजे म्हणून जोकरचा ड्रेस पाठवत असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. चित्रा वाघ यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एक विदूषकही आणण्यात आला होता. चित्रा वाघ बोलत असताना हा जोकर मागे फिरत होता. स्वतःच्या सडलेल्या बुद्धीचा भोपळा बाहेर आणण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ना घर का ना घाट का? अशी अवस्था उद्धव ठाकरे यांची झाली असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

विदूषकांची टोळी राज्यात फिरतेय यात पहिले आहेत संजय राऊत, दुसरं आहे भास्कर जाधव आणि तिसरा विदूषक उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरेकडे दुसरे काम उरल नाही म्हणून ते करमणूक करत आहेत असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला. आमच्या नेत्यांच्या नादी लागू नका. तुम्ही आमच्या नेत्यांवर बोलाल पण यापेक्षा कडक उत्तर देऊ असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांना गोध्रा दिसते. उद्धव ठाकरे हिंदू विरोधी झाले आता श्रीरामा बद्दल देखील ते बोलत आहेत असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला. 370 काम हटवून दाखवलं हा पुरुषार्थ आहे. पण उद्धव ठाकरे यांचा पुरुषार्थ काय तर कोविड काळात भ्रष्टाचार, पत्राचाळ घोटाळा, यात आहे असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

'जानेवारी दंगली होणार'
जानेवारी 2024 मध्ये अयोध्येत राममंदिराच्या उद्घाटनासाठी मोठा जनसमुदाय एकत्र येणार आहे. मोठ्या संख्येनं लोकं बस आणि ट्रकमधून उद्घाटनाला येतील. पण जेव्हा लोक परत निघतील तेव्हा गोध्राासारखी दंगल घडवली जाऊ शकते अशी भीती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. यावरुन भाजपाने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 

भाजपकडून टीका
उद्धव ठाकरे गेले कित्येक दिवस भविष्य वर्तवत आहे.  अमुक ठिकाणी भाजप दंगली घडवणार, तमुक वातावरण पेटणार असं भविष्य सांगतायत. पोपट घेऊन भविष्य सांगणाऱ्या भोंदूसारखी उद्धव ठाकरे यांची अवस्था झाल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीआहे.