मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून देशातील अनेक नेत्यांनी संविधान बचाव रॅली काढली आहे. मुंबई विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ही रॅली सुरू झाली आहे. गेट वे ऑफ इंडियापर्यंत ही रॅली असणार आहे. शरद पवार, शरद यादव, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे आले आहेत.
‘संविधान वाचवण्यासाठी आम्ही आलो. मोदींच्या कारभार विरोधात आलोत. या राज्यांत मोदी गुजरात मॉडेल हुकूमशाही कारभार पद्धत वापराला जातो. उद्धव ठाकरे हे स्वतंत्र निवडणूक लढवतात चांगली गोष्ट आहे मी त्यांचं स्वागत करतो’, असं हार्दिक पटेल म्हणाला.
यात राजू शेट्टी यांच्यासह, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, जनता दलचे नेते शरद यादव, माकपचे सीताराम येचुरी, लोक भारतीचे कपिल पाटील, गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दीक पटेल, गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी, कन्हैया कुमार आदी सहभागी झाले आहेत. ही संविधान बचाव रॅली मंत्रालयाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन गेट वे ऑफ इंडियावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ संपणार आहे.
Maharashtra: Samvidhaan bachao rally by opposition parties in #Mumbai. Hardik Patel also present pic.twitter.com/OY61P2q0Ea
— ANI (@ANI) January 26, 2018
विरोधक आणि भाजपा प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारची रॅली काढणार आहे. विरोधकांच्या मुंबईतील संविधान बचाव रॅलीची सांगता गेट वे ऑफ इंडियावर होणार असली तरी पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडियाने या यात्रेला परवानगी नाकारली आहे. या ठिकाणी मुशायऱ्याचा कार्यक्रम असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आलंय. मात्र तरीही गेट वे ऑफ इंडियावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करणारच अशी भूमिका विरोधकांनी घेतलीय. त्यामुळे प्रजासत्ताक दिनी मुंबईत विरोधकांविरुद्ध भाजपा असा संघर्ष पेटण्याची चिन्हं आहेत.