33 कोटी वृक्ष लागवडीत भ्रष्टाचार? समितीचा चौकशी अहवाल आला समोर; सुधीर मुनगंटीवार यांना...

Sudhir Mungantiwar Vruksh Lagvad: या प्रकरणात सखोल चौकशी केली असता कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नाही, असे स्पष्ट करण्यात आला आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 16, 2024, 12:46 PM IST
33 कोटी वृक्ष लागवडीत भ्रष्टाचार? समितीचा चौकशी अहवाल आला समोर; सुधीर मुनगंटीवार यांना... title=
Maharashtra tree planting

Sudhir Mungantiwar Vruksh Lagvad:  33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सर्वात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. विरोधकांनी यासंदर्भात तत्कालिन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. 

33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस सरकार काळात मुनगंटीवार यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता.महा विकास आघाडी सरकारने आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. दरम्यान यासंदर्भात अपडेट समोर आली आहे. 

समितीच्या चौकशीत कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल समोर आला आहे. समितीच्या अहवालात नेमके काय? याबद्दल जाणून घेऊया. 

या प्रकरणात सखोल चौकशी केली असता कोणतीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झालेला नाही, असे स्पष्ट करण्यात आला आहे. राज्यात मोहिम यशस्वी झाल्याचे समितीचे स्पष्ट या अहवालातून सांगण्यात आले आहे. मोहिम राबवताना काही अडचणी आणि त्रुटी राहिल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्रुटी आणि अडचणी दूर करण्यासाठी सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आली आहे. 

लहान रोपट्यांऐवजी मोठी रोपटी लावण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे राज्यात 52 कोटी वृक्ष लागल्याची जमेची बाजू असल्याचे समितीचे म्हणणे आहे. खाणींच्या परिसरात झाडे लावण्याची शिफारस या अहवालातून करण्यात आली आहे.

काय म्हणाले मुनगंटीवार?

या महाराष्ट्रामध्ये वृक्ष लागवडीचे एक लोक आंदोलन करण्यात आले.हा एक वृक्ष सत्याग्रह होता. ग्लोबल वॉर्मिग बाबत एक चिंता व्यक्त केली जात होती. पण वन विभागाने सर्वाँना एकत्र घेऊन एक कार्यक्रम हाती घेतला. कांदळवन हे आपल्याला सुरक्षा कवच देते. काही लोकांनी कोणतीही माहिती न घेता ही झाडे वनविभागाने लावली असे म्हंटले पण काही सामाजिक संस्था काही कपन्यांनी वृक्ष लागवडीत पुढाकार घेतला.वन विभागाने फक्त टॅगिंग केले, असे मुनगंटीवार म्हणाले. 

महाविकास आघाडी सरकारमध्ये एक समिती नेमली. समिती नेमून चौकशी करा, असे मी देखील त्यावेळी म्हणालो. माहिती घेतली पण त्यांना काही सापडले नाही. न समजता जेव्हा आपण गालबोट लावतो तेव्हा असा अहवाल येतो. वृक्ष लागवडीला गालबोट लावायची भूमिका योग्य नव्हती, असेही ते म्हणाले.