मुंबई : जे अंगावर येतील त्यांच्या हात धुवून मागे लागेन, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी विरोधकांना दिला आहे. तुम्ही एक सूड काढा, आम्ही १० सूड काढू, असा ठाकरी इशारा दिला. महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) वर्षपूर्तीनिमित्त 'सामना'च्या मुलाखतीत हा इशारा दिला. कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांनी विशेष मुलाखत (Uddhav Thackeray Interview) घेतली. यावेळी त्यांना वाढीव वीज बिल (electricity bill) प्रश्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणालेत, राज्य मंत्रिमंडळाने हा विषय सोडलेला नाही. काय करता येऊ शकते. काय करायला पाहिजे, या गोष्टींवर आमचा विचार सुरू आहे.
मुळामध्ये ‘वाढीव’ हा जो शब्द आहे तो वाढीव आहे का? हा विषय मंत्रिमंडळात पण चर्चिला जात आहे. खरंच मीटरमुळे काही बिले वाढलीयेत का? का दोन-तीन महिन्यांची बिले एकदम आली आहेत? त्यामुळे ती वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी जिथे जिथे तक्रारी आल्या, तिथे तिथे या वीज मंडळातील लोकं जाऊन मीटर चेक करून आली आणि ती चेक केल्यानंतर बहुतेकांच्या शंकेचं निरसन झालेले आहे. तरीदेखील अजूनही तो विषय मी काही सोडलेला नाही. मंत्रिमंडळाने सोडलेला नाही. काय करता येऊ शकते, काय करायला पाहिजे या गोष्टींवर आमचा विचार सुरू आहे. पण एक गोष्ट सांगतो, जे काय आता सगळे थयथयाट करण्याचा प्रयत्न करताहेत. कारण त्यांच्यात आता काय ताकदच राहिलेली नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
थयथयाट करणाऱ्या विरोधकांना मला एक-दोन प्रश्न विचारायचे आहेत की, साधारणतः जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे भाव आज काय आहेत हो? पर लिटर. काल मी माहिती काढली, आजसुद्धा साधारणतः पर लिटर २० रुपयांच्या आसपास आहेत… आणि आपल्याकडे ८८ रुपये आहे, का नाही कमी करत? का नाही तुम्ही त्याच्यावर आंदोलन करत? गॅसचे भावही वाढले होते त्यावेळी गॅसची सबसिडीही काढली.
पण क्रूड तेलाचे भाव कमी झाल्यानंतरसुद्धा आपल्या देशात पेट्रोल, डिझेलचे भाव हे का चढते आहेत? बाकी जागतिक अर्थव्यवस्था वगैरे यावर मला बोलायचे नाही. पण २०१४ च्या आधी तुमचा एक तो मुद्दा होता की, डॉलर किती चढले. तेव्हा मला वाटतं ५९ रुपये होता. आता किती झालाय डॉलरचा भाव? काय व्यवस्था तुम्ही केली? आमच्या अंगावर येण्याआधी निदान बाहेर पडताना आरशात तुमचं तोंड तर बघा. पण काय झाले आहे, हल्ली बरेच जण स्वतःचं तोंड आरशात बघितल्यानंतरही बोंबलतात की, भ्रष्टाचार झाला.
भ्रष्टाचार झाला. सगळे अवाक होतात. अरे काय म्हणतोस. स्वतःचंच तोंड आरशात दिसतंय आणि म्हणतोस भ्रष्टाचार झाला आहे. तो म्हणतो. तसं नाही, आरशात भ्रष्टाचार झाला आहे. म्हणजे गैरसमज नको व्हायला, असे ते म्हणाले.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.