मुंबई : आता कुठे कोरोनाच्या धसक्यातून मुंबई सावरत असताना आता नवं संकट मुंबईवर येत आहे. रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. 21 रेल्वे स्थानकांवर सापडल्या मलेरियाच्या अळ्या आढळून आल्या आहेत. या घटनेमुळे भीतीचं वातावरण आहे.
माहीम,माटुंगा,शीव अशा 21 स्थानकांच्या छतावर मलेरियाच्या अळ्या आढळून आल्या आहेत. रेल्वेच्या गलथान कारभारामुळे मुंबईकरांचा जीव धोक्यात आला आहे. पालिकेने या ठिकाणी डास प्रतिबंधक फवारणी करायला सुरूवात केली आहे.
मुंबईत पावसाने गेल्या 24 तासांपासून थोडी उसंत घेतली आहे. आधीच मुंबईत सर्दी, खोकला ताप असं व्हायरलच साथीच्या आजाराचं संकट असताना आता मलेरियाच्या अळ्या सापडल्या आहे.
मलेरिया नेमका कसा होतो
मलेरिया ताप हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे जो डासांमुळे होतो. जे एनोफिलीस या मादी डासाच्या चावण्यामुळे होते. या मादी डासात एक विशेष प्रकारचा जीवाणू आढळतो, ज्याला वैद्यकीय भाषेत प्लास्मोडियम असं म्हणतात. मलेरिया पसरवणाऱ्या या मादी डासात जिवाणूंच्या 5 प्रजाती आहेत.
काय आहेत मलेरियाची लक्षणं?
- थंडी भरून येणं
- उच्च ताप
- डोकेदुखी
- घसा खवखवणे
- घाम येणे
- थकवा
- अस्वस्थ वाटत राहाणं
- उलट्या
मलेरिया 5 वेगवेगळ्या प्रकारचा असतो, त्याचं लवकर निदान होणं फार गरजेचं आहे. या आजारातून पूर्ण बरे होण्यासाठी साधारण 14 दिवसांचा अवधी लागतो.