मरीन ड्राईव्हवर सुस्साट गाडी चालवणे पडणार महागात!

मरीन ड्राईव्हवर बेफाम वेग महागात पडणार आहे. मरीन ड्राईव्हवर स्पिडी कॅमेरा तैनात करण्यात आलाय. या कॅमेऱ्यात गाडीचा वेग कैद होतो. त्यानंतर फोटो आणि नंबरसह तुम्हाला ई चलानाने दंड ठोठावला जातो.

Updated: May 26, 2017, 05:46 PM IST
मरीन ड्राईव्हवर सुस्साट गाडी चालवणे पडणार महागात! title=

मुंबई : मरीन ड्राईव्हवर बेफाम वेग महागात पडणार आहे. मरीन ड्राईव्हवर स्पिडी कॅमेरा तैनात करण्यात आलाय. या कॅमेऱ्यात गाडीचा वेग कैद होतो. त्यानंतर फोटो आणि नंबरसह तुम्हाला ई चलानाने दंड ठोठावला जातो.

जगप्रसिद्ध क्विन नेकलेस मरीन ड्राईव्हवर भरधाव वेगानं गाडी चालवण्याची मजा काही औरच आहे. यामुळे मरीन ड्राईव्हवर भरधाव वेगानं गाडी चालवली जायची. मात्र, आता मरीन ड्राईव्हवर भरधाव वेगानं गाडी चालवणं तुम्हाला महागात पडू शकतं. कारण मरीन ड्राईव्हवर ट्रॅफिक पोलिसांनी स्पीडी कॅमेरे लावलेत.

या कॅमे-यामुळे गाडी किती वेगानं चालवली गेली. गाडीचा फोटो, गाडीचा नंबर आणि गाडीची सर्व माहिती कॅमे-यात थेट कैद होतंय. ज्यामुळे ई-चलनद्वारे दंड ठोठावला जातोय.