मुंबईत १० रुपयांत शिवथाळी अगोदर माऊली थाळी

१० रुपयांत पोटभर जेवण 

Updated: Dec 6, 2019, 10:07 PM IST
मुंबईत १० रुपयांत शिवथाळी अगोदर माऊली थाळी

अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० रुपयांत पोटभर जेवण देण्याची घोषणा निवडणुकीपूर्वी केली होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकारच्या १० रुपयांच्या थाळीची प्रतीक्षा असताना शिवसेनेनं माऊली थाळी सुरू केली आहे. मुलुंडचे शिवसैनिक जगदीश शेट्टी यांनी रयत माऊली अन्न रथाच्या माध्यमातून दहा रुपयात थाळी उपलब्ध करून दिली आहे. यात वरण भात, चपाती भाजी असं या थाळीचं स्वरुप आहे.

येत्या काळात राज्यात सगळीकडं १० रुपयांची शिवथाळी उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

१० रुपयातली शिवथाळी लोकप्रिय होईल यात वाद नाही. पण ही शिवथाळी झुणकाभाकरच्या मार्गानं जाऊ नये अशी सर्वसामान्यांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.