रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Updated: Jul 28, 2018, 05:55 PM IST
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक title=

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार ते मशिद स्थानकांदरम्यान अप-धिम्या मार्गासह हार्बर मार्गावरील पनवेल-वाशी मार्गावर मध्य रेल्वेनं रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. विद्याविहार ते मशिद स्थानकांदरम्यान रविवारी अप धिम्या मार्गावर सकाळी ११ वाजून २० मिनिटं ते दुपारी ४ वाजून २० मिनिटांपर्यंत दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी साडेअकरा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत ब्लॉक असेल.

जलद मार्गावर जम्बोब्लॉक

ट्रान्स हार्बर मार्गवरील लोकल सेवाही सकाळी १० वाजून १२ मिनिटं ते दुपारी ४ वाजून २६ मिनिटांपर्यंत बंद राहणार आहे. पश्चिम रेल्वेवरील भाईंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप-डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल.