मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

उपनगरी रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मुंबईत रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर विक्रोळी ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:30 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11:10 ते 4:10 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

Updated: Jul 16, 2017, 09:07 AM IST
मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक title=

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मुंबईत रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर विक्रोळी ते दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:30 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी 11:10 ते 4:10 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

या दरम्यान कुर्ला ते वाशी मार्ग बंद असणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान सकाळी 10:35 ते 3:35 दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे.