मध्य रेल्वेवर तीन दिवसांचा मेगाब्लॉक!

मध्य रेल्वेने बेलापूर इथे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या कामांसाठी आज मध्यरात्रीपासून ते 29 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक घेतलाय. 

Updated: Dec 26, 2017, 11:20 PM IST
मध्य रेल्वेवर तीन दिवसांचा मेगाब्लॉक!   title=

मुंबई : मध्य रेल्वेने बेलापूर इथे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनच्या कामांसाठी आज मध्यरात्रीपासून ते 29 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक घेतलाय. 

त्यामुळे हार्बर मार्गावर चालणाऱ्या 604 फेऱ्यांपैकी 34 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष 34 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. 

मध्य रेल्वेने घेतलेल्या 48 तासांच्या ब्लॉकमध्ये सकाळच्या वेळेस बेलापूरहून सुटणाऱ्या 8 पैकी सात फेऱ्या प्लॅटफॉर्म क्रमांत तीन आणि एक लोकल वाशीहून सुटणार आहे. 

ट्रान्स-हार्बर सेवेवर या ब्लॉकचा कोणताही परिणाम होणार नाही.