जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल, हवामान विभागाचा नवा अंदाज

राज्यात मान्सून सक्रीय झाला तरी काही ठिकाणीच पाऊस झाला. संपूर्ण राज्यात पाऊस झालेला नाही.  

Updated: Jun 27, 2019, 10:55 AM IST
जुलै महिन्यात चांगला पाऊस होईल, हवामान विभागाचा नवा अंदाज title=

मुंबई : राज्यात मान्सून सक्रीय झाला तरी काही ठिकाणीच पाऊस झाला. संपूर्ण राज्यात पाऊस झालेला नाही. कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी काही भागात पाऊस झाला. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात पाऊस व्हायचा आहे. जून महिना संपला तरी पासचा पत्ता नाही. त्यामुळे राज्यात पाणी संकट अधिक गडद होत आहे. दरम्यान, जून महिन्यात पाऊस झाला नाही तरी जुलै महिन्यात पाऊस चांगला होईल, असा नवा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे जुलै महिन्यात तरी पाऊस पडेल का, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, इन्सॅट थ्री डीने आज सकाळी सातच्या सुमारास दिलेल्या छायाचित्रात महाराष्ट्रावर हळूहळू ढग दाटू लागल्याचं चित्र दिसते आहे. कालची आणि आजची उपग्रहाने दिलेल्या छायाचित्रांची तुलना केली असता दोन्ही छायाचित्रात कमालीचा फरक दिसून येत आहे. कालच्या छायाचित्रात महाराष्ट्रावर एकही ढग दिसत नव्हता. आज मात्र उत्तर महाराष्ट्रावर काही प्रमाण ढग दिसत आहेत. या छायाचित्राचं वर्णन ढगांची दाटी असं वर्णन करता येणार नाही. पण कालपेक्षा आजचं चित्र नक्कीच दिलासादायक आहे. इकडे कोकण किनारपट्टीकडेही ढगांची वाटचाल सुरू झाल्याचे आजच्या छायाचित्रात स्पष्ट दिसते आहे. पण वाऱ्यांची दिशा आणि कमी दाबाचे पट्टे यावरच मान्सूनच्या पुढच्या वाटचाल ठरणार नाही. 

दरम्यान, कोकणातील रायगड जिल्ह्याच्या अनेक भागात आज पहाटेच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर पावसाअभावी करपू लागलेल्या भातरोपांनाही जीवदान मिळाले आहे. रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात अलिबागसह पेण, नागोठणे, कोलाड, पाली परिसरात पहाटेच्या सुमारास पाऊस झाला. तासभर बरसल्यानंतर पावसानं उघडीप घेतली आहे.