घर घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज, म्हाडाच्या घरांची लॉटरी या दिवशी काढणार

Mhada lottery 2021 : कोरोनाच्या उद्रेकामुळे पुढे ढकलण्यात आलेली सर्वसामान्यांना परवडणारी म्हाडाच्या घरांची (Mhada House) लॉटरी काढण्यात येणार आहे.

Updated: Aug 5, 2021, 11:48 AM IST
घर घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज, म्हाडाच्या घरांची लॉटरी या दिवशी काढणार
संग्रहित छाया

मुंबई : Mhada lottery 2021 : कोरोनाच्या उद्रेकामुळे पुढे ढकलण्यात आलेली सर्वसामान्यांना परवडणारी म्हाडाच्या घरांची (Mhada House) लॉटरी दसऱ्याला काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या लॉटरीद्वारे एकूण 9 हजार घरे उपलब्ध होणार आहेत. यासाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 

या लॉटरीअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येणारी 6500 घरे, कोकण मंडळ आवास परियोजनेअंतर्गत येणारी 2 हजार घरे आणि 20 टक्के योजनेअंतर्गत येणा-या 500 घरांचा समावेश आहे. ठाणे, मीरारोड, वर्तकनगर, कल्याण, वडवली, गोथेघर आणि विरार बोळिंज नाका येथे घरं उपलब्ध होत आहेत. 

लवकरच जाहिरात प्रसिद्ध

या लॉटरीद्वारे एकूण 9 हजार घरे उपलब्ध होणार आहेत. यासाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या लॉटरीअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येणारी 6500 घरे, कोकण मंडळ आवास परियोजनेअंतर्गत येणारी 2000 घरे आणि 20 टक्के योजनेअंतर्गत येणाऱ्या 500 घरांचा समावेश आहे. 

ही घरे निम्न आणि मध्यम वर्गीयांसाठी असणार आहेत. ठाणे, मीरारोड, वर्तकनगर, कल्याण, वडवली, गोथेघर आणि विरार बोळींज नाका येथे असणार आहेत. मीरारोड येथे मध्यम वर्गीयांसाठी टू बीएचकेची 196 घरे उपलब्ध होत आहेत. तसेच ठाण्यातील वर्तकनगरमध्ये 67 दुकानेही उपलब्ध होत आहेत.

या घरांची किंमत 38 ते 40 लाख 

कोकण मंडळाच्या लॉटरीद्वारे, ठाण्यातील वर्तकनगर येथे अल्प उत्पन्न गटासाठी 67 घरे उपलब्घ असणार आहेत. या घरांचे क्षेत्रफळ 320 चौरस फूट इतके असणार आहे. तर, या घरांची किंमत 38 ते 40 लाख इतकी असणार आहे. तर वडवलीत 29 घरे असणार आहेत. येथील घरांची किंमत 16 लाखांच्या आसपास असणार आहे. तर विरार येथे 1300 घरे असणार आहेत. यातील एक हजार घरे ही अल्प उत्पन्न गट आणि उर्वरित घरे ही मध्यम उत्पन्न गटासाठी आहेत.