भाजपच्या बंडखोर आमदार गीता जैन करणार शिवसेनेत प्रवेश

भाजपच्या बंडखोर आमदार गीता जैन या आता शिवसेनेत प्रवेश करणार आहे.  

Updated: Oct 23, 2020, 09:26 PM IST
भाजपच्या बंडखोर आमदार गीता जैन करणार शिवसेनेत प्रवेश title=
Pic Courtesy : Geeta Jain @Facebook

मुंबई : भाजपच्या बंडखोर आमदार गीता जैन या आता शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये शिवसेनेचे ताकद वाढण्यास मदत होणार आहे. भाजपमध्ये बंडखोरी करत त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. भाजपच्या त्या माजी महापौर होत्या. त्यामुळे भाजपला एकप्रकारे हा धक्का मानला जात आहे.

मीरा - भाईंदर मतदारसंघातील अपक्ष आमदार गीता जैन या उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहे. उद्या दुपारी १२.३० वाजता मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.