मुंबईत सेक्स रॅकेट चालवणारा फिल्म प्रोड्युसर गजाआड

फिल्ममध्ये काम करण्याचं आमिष दाखवून सेक्स रॅकेट चालवायचा, राज कुंद्रानंतर फिल्म प्रोड्युसर ताब्यात

Updated: Jul 20, 2021, 09:59 PM IST
मुंबईत सेक्स रॅकेट चालवणारा फिल्म प्रोड्युसर गजाआड title=

प्रथमेश तावडे झी मीडिया मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला पोलिसांनी डर्टी पिक्चरसाठी अटक केल्याची घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायकक बातमी समोर येत आहे. मीरा रोड परिसरातून एका फिल्म प्रोड्युसरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सेक्स रॅकेट प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत फिल्म प्रोड्युसरसह त्याच्या साथीदाराला अटक केली. 

या प्रकरणी त्याच्यासोबत असलेल्या एका साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फिल्म प्रोड्युसर कनय्यालाल भालछंदांनी आणि त्याचा साथीदार परमानंद भालछंदांनी अशी दोघांची नावं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार हा फिल्म प्रोड्युसर छोट्या पडद्यासाठी फिल्म प्रोडक्शनची कामं करतो. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याचं आमिष दाखवून तो तरुणींना भुलवायचा. या तरुणींना फिल्ममध्ये काम देण्याचं आमिष दाखवून त्यांकडून देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 

याबाबतची गुप्त माहिती जेव्हा मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या क्राईम ब्रांच युनिटला मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी वेश बदलून या प्रकरणाची खात्री केली त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

याप्रकरणी मिरारोड पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात पिटा अंतर्गत कारवाई करण्यात आलीं असून दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीसाठी पाठवण्यात आलं आहे.