आदित्य ठाकरेंची माजी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

माजी मुख्यमंत्र्यांनी याबद्दल माफी मागावी अशी मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी केली 

Updated: Feb 26, 2020, 12:43 PM IST
आदित्य ठाकरेंची माजी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केलीय. शिवसेनेनं बांगड्या घातल्या असतील मात्र भाजपनं नाही असं वक्तव्य फडणवीसांनी आझाद मैदानातल्या भाषणात केलं होतं. त्यावरून आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. अशा प्रकारचं वक्तव्य तुम्हाला शोभत नाही असं ट्विट करून फडणवीसांवर टीका केलीय. माजी मुख्यमंत्र्यांनी याबद्दल माफी मागावी अशी मागणी देखील आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 

राज्याचा पर्यटन विकास आराखडा सरकार तयार करत आहे. एशियन डेव्हलमेंट बँक पर्यटनासाठी निधी देत नसला तरी सरकारने स्वतंत्र निधी देण्याची तयारी दाखवली आहे असं आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत स्पष्ट केलं.

आराखड्यातून रस्ते विकासाचा हिस्सा वेगळा करून एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या नियमात ही बाब बसवता येईल अशी सूचना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

त्यावर उत्तर देताना आदित्य ठाकरेंऐवजी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार उभे राहिले. विरोधी पक्षनेत्यांची सूचना मान्य असल्याचं अजित पवार म्हणाले.