मुंबई : परळ येथील मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाला भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे नाव देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेय. मनसेने आपल्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन टि्वट मागणी करताना महापालिका आणि महपौर विश्वानाथ महाडेश्वर यांना टॅग केले आहे. मनसेने याआधी सुद्धा केईएम रुग्णालयाला आनंदीबाई जोशी यांचे नाव देण्याची मागणी केली होती. आज आनंदीबाई जोशी यांच्या १५३ व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करताना मनसेने पुन्हा एकदा ही मागणी केलेय. दरम्यान, गूगल डूडलने भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांना मानवंदना दिलेय.
केईएमचे पूर्ण नाव किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय असून ब्रिटिश काळापासून उभ्या असलेल्या या रुग्णालयात देशभरातून रुग्ण येत असतात. तसेच याच नावावरुन परदेशातून फंड मिळत आहे. त्यामुळे या नावाचा विचार होणार का, याचीही चर्चा सुरु झालेय.
मुंबई : केईएम रुग्णालयाचे नाव 'डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालय' करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रस्ताव ठेवला होता. आज आनंदीबाई जोशी यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा @MCGM_BMC , @iamvmahadeshwar यांना प्रस्तावाची पुन्हा आठवण करून देत आहोत. जय महाराष्ट्र! https://t.co/MWbOYsdxTk
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) March 31, 2018
अठराव्या शतकात शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या आनंदीबाई जोशी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला. ज्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा हक्कच नव्हता. त्या काळात सामाजिक व कौटुंबिक विरोधावर मात करत अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत प्रगतीच्या दिशेने उचललेले एक क्रांतिकारी पाऊल म्हणजे आनंदीबाई होय.
३१ मार्च १८६५ रोजी आनंदीबाई यांचा पुण्यात एका सधन कुटुंबात जन्म झाला. परंतु तत्कालीन रुढी परंपरानुसार वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी त्यांचा विवाह त्यांच्या वयापेक्षा तब्बल २० वर्ष मोठ्या गोपाळराव जोशी यांच्याशी करण्यात आला. स्वत: शिक्षित असल्यामुळे गोपाळराव अठराव्या शतकातील भारतीय विचारधारेपेक्षा बरेच पुढारलेले होते. त्यांनी आनंदीबाईंना शिक्षणासाठी प्रोत्साहीत केले. पुढे प्राथमिक शिक्षण सुरु असतानाच वयाच्या १४ व्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला.
४ जून १८८३ साली आनंदीबाई उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पोहोचल्या. परदेशात जाउन शिक्षण घेणाऱ्या भारतीय इतिहासातील पहिल्या महिला होण्याचा मान यामुळे आनंदीबाईंना मिळाला.