'माफी मांगो राज ठाकरे' म्हणत मनसे अध्यक्षांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या विरोधासाठी चक्क एक भोजपुरी गाणं तयार करण्यात आलं आहे. हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे

Updated: May 13, 2022, 09:58 AM IST
'माफी मांगो राज ठाकरे' म्हणत मनसे अध्यक्षांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध title=

मुंबईः हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन नव्यानं मैदानात उतरलेल्या राज ठाकरेंना आता अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला बृज भुषण सिंह वारंवार आव्हान देत आहेत. त्यानंतर आता एक भोजपुरी गाणं देखील तयार करण्यात आलंय. 

राज ठाकरे पाच जूनला अयोध्याला जाणार आहेत.मात्र भाजप खासदार ब्रिजभूषण यांनी या दौऱ्याला विरोध केला असून राज ठाकरे यांनी आधी उत्तर भारतीयांची जाहीर माफी मागावी अथवा अयोध्येत येऊ देणार नाही असे आवाहन केले आहे. आता राज ठाकरेंच्या दौऱ्याला भोजपुरी गाण्यातून आव्हान देण्यात आलं आहे. राज ठाकरेंच्या विरोधासाठी चक्क एक भोजपुरी गाणं तयार करण्यात आलं आहे. हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधून चांगलाच विरोध होत असल्याचं दिसून येतंय. राज ठाकरेंनी अयोध्येत येण्यापूर्वी उत्तर भारतीयांची माफी मागावी अशी मागणी आता गाण्याच्या माध्यमातूनही होत आहे.  'माफी मांगो राज ठाकरे... अगर अयोध्या आना है' हे गाणं तयार करण्यात आलं आहे. 

तर तिकडे बृज भुषण सिंह यांनी आता 'राज ठाकरेंनी आता माफी मागितली तरी त्यांना 5 जूनला अयोध्येत प्रवेश नाही' असं जाहीर केलं आहे. त्यामुळे आता मनसे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.